वरठी ठाण्याच्या हद्दीत अनेक दिवसांपासून गावठी दारूनिर्मिती केली जात आहे. एकट्या वरठी येथील सहा वाॅर्डांत जवळपास ७० ते ८० हातभट्ट्या सुरू आहे. खुलेआम दारूची विक्री केली जाते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांत असंतोष वाढला आहे. अनेकांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. यावर स्थानिक पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले. दोन दिवसांपासून धडक कारवाई करत सात जणांवर कारवाई केली. बुधवारी भोसा-टाकळी परिसरात रनिंग हातभट्टीवर धाड टाकून यशवंत माहुले याला ताब्यात घेतले. ३०० किलो मोहसडवा नष्ट करण्यात आला. मंगळवारच्या कारवाईत वरठी येथे सहा दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात नेहरू, शास्त्री व हनुमान वॉर्डांतील प्रत्येकी दोन विक्रेत्यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही धाड टाकण्यात आली.