पावसाचे साचलेले पाणी शिरले नागरिकांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:41+5:302021-09-18T04:38:41+5:30
पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेती केली जात असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहते. दोन वर्षांपूर्वी ...
पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेती केली जात असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहते. दोन वर्षांपूर्वी लहान मुलगा खेळत असताना पाण्यात पडून जीवितहानी झाली होती. तशीच भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येणार नाही यासाठी नगर परिषद प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. घरासमोर आणि रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतात. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बॉक्स
नगरसेवकाची नागरिकांना केवळ आश्वासने
आनंदनगरातील विविध समस्यांकडे वाॅर्ड मेंबर यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. केवळ पाहणी करून नागरिकांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. नगर परिषदेला वार्षिक घराचा कर भरूनही अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वर्षानुवर्षे हीच समस्या कायम आहे. तरीही या समस्या नगर परिषद प्रशासनासह नगरसेवकाला दिसत नाहीत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पावसाळ्यात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून पक्क्या नाल्यांचे बांधकाम करून वारंवार जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी आनंद नगरातील रहिवाशांनी केली आहे.