कोंढा कोसरा : पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पवनी जिल्हा परिषद भंडारा तर्फे कोंढा येथे तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. त्यास शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.तालुकास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती अर्चना वैद्य होत्या. मुख्य अतिथी म्हणून आमदार अॅड. रामचंद्र अवसरे होते. यावेळी सभापती पवनी कृषी उत्पन्न बाजार समिती लोमेश वैद्य, महानंदा मुंबईचे संचालक विलास काटेखाये, पवनी तालुका भाजपाध्यक्ष के. डी. मोटघरे, अल्का फुंडे, कल्पना गभने, गंगाधरराव जिभकाटे, अनिता तेलंग, शिला कुर्झेकर, डॉ. किशोर कुंभरे, डॉ. राजू शहारे, धनराज जांभुळकर, अमित जिभकाटे, ज्ञानदेव कुर्झेकर, अंबादास धारगावे, वामणराव जिभकाटे उपस्थित होते. खा. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करावे, राज्यातील व केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहे. त्याचा एक भाग म्हणून तालुकास्तरीय भव्यप्रदर्शनी प्रत्येक तालुक्यात भरविण्यात येत आहे. यावेळी पशुपक्षांचे पुरस्कार व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. यामध्ये देशी गाय : प्रथम पारितोषिक शालीकराम भांडारकर रा. पालोरा (चौ.), द्वितीय मोरेश्वर लिचडे कोंढा, तृतीय रविंद्र करंजेकर रा. अड्याळ, संकरीत गाय : प्रथम पारितोषिक मुरलीधर लिचडे रा. कोंढा, द्वितीय अमित जिभकाटे कोंढा, तृतीय अनिल लिचडे रा. कोंढा. म्हैस : प्रथम पारितोषिक मारोती नखाते रा. मोखारा, द्वितीय निखिल लिचडे रा. कोंढा, तृतीय हंसदास भिवगडे रा. कोंढा. ० ते ६ महिने संकरित कालवड : प्रथम मोरेश्वर काटेखाये रा. मोखारा, द्वितीय गोपाल तलमले मालची, तृतीय धनराज देशमुख रा. कोसरा. ०६ ते १२ महिने संकरीत कालवड : प्रथम अतुल बावणकर रा. कोंढा, द्वितीय नामदेव बावणकर कोंढा, तृतीय नारायण भुरे रा. कोंढा. ६ ते १२ महिने: प्रथम दौलत भिवगडे रा. कोंढा म्हशिच्या पारड्या, द्वितीय गोलू सेलोकर, तृतीय मोतीलाल लिमजे दाघेही रा. कोंढा, बैलजोडी गट : प्रथम राजहंस नागपुरे रा. पाथरी, द्वितीय भुपेश काटेखाये रा. चिचाळ, तृतीय मधूकर जिभकाटे रा. कोंढा, शेळी मेंढी (नर गट): प्रथम सुनिल बोरकर रा. कोंढा, (मादी गट) प्रथम संजय बन्सोड रा. भावड, द्वितीय देवानंद कळंबे रा. कोंढा, कुक्कुट पक्षी नर व मादी : प्रथम पांडुरंग भुजबळ रा. नेरला, द्वितीय सचिन कोरे रा. खैरी, तृतीय कैलास निपाने रा. अड्याळ असे बक्षीर शेतकऱ्यांनी मिळविले. त्यांना पाहुण्यांतर्फे रोख रक्कम, प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. एस. वाय. पाटील, डॉ. अरविंद ठाकरे, डॉ. सुभाष रेहपाडे, डॉ. गुणवंत भडके आणि पशुसंवर्धन विभागीय अधिकारी उपस्थित होते. संचालन व आभार डॉ. गिरीश गभणे यांनी केले. जागृती विद्यालय कोसरा, प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थीनीनी नृत्य सादर केले. (वार्ताहर)
पशुपक्षी प्रदर्शनीला प्रतिसाद
By admin | Published: February 17, 2017 12:42 AM