राईस मिल इमारतीत जिवंत वीजप्रवाह सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:46+5:302021-08-27T04:38:46+5:30
ज्ञानेश्वरी महेंद्र ढोमणे (वय ३०) असे विजेचा धक्का लागलेल्या महिलेचे नाव आहे. नाकाडोंगरी सहकारी राईस मिल इमारतीतील व्हरांड्यात सेंट्रिंगमध्ये ...
ज्ञानेश्वरी महेंद्र ढोमणे (वय ३०) असे विजेचा धक्का लागलेल्या महिलेचे नाव आहे. नाकाडोंगरी सहकारी राईस मिल इमारतीतील व्हरांड्यात सेंट्रिंगमध्ये घालण्यात येणारी बारीक लोखंडी तार पसरविण्यात आली व त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास राईस मिल परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी उठली. तिला जिवंत विद्युततारांचा स्पर्श झाला. त्यामुळे ती दूर फेकली गेली. तिने आरडाओरड केली. त्यामुळे पतीसह इतर कर्मचारी जागे झाले. त्यांनी तत्काळ वीजपुरवठा बंद केला. गुरुवारी सकाळी राईस मिलच्या संचालक मंडळाने राईस मिलला भेट दिली व चौकशी केली. या प्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात राईस मिलचे अध्यक्ष ईश्वर दयाल गोपाले यांनी तक्रार दिली. राईस मिलचे चौकीदार विजय कावळे यांची संचालक मंडळाने चौकशी करून माहिती घेतली. सदर प्रकार कुणी घडवून आणला व त्याचा उद्देश काय होता, याचा तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.