वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:08 AM2021-02-28T05:08:28+5:302021-02-28T05:08:28+5:30

महागाईने गोरगरिबांवर संकट ओढवले आहे. विविध वस्तूंचे दर दररोज वाढत असताना इंधन दराकडे बोट दाखविले जाते. साहजिकच ग्राहकांना याचा ...

Rising inflation has crippled the public's budget | वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

googlenewsNext

महागाईने गोरगरिबांवर संकट ओढवले आहे. विविध वस्तूंचे दर दररोज वाढत असताना इंधन दराकडे बोट दाखविले जाते. साहजिकच ग्राहकांना याचा चटका सहन करावा लागत आहे.

फुटपाथवरील लघुउद्योगांनाही महागाईचा सामना करीत व्यवसाय सांभाळावा लागत आहे. छोटे व्यापारी व ग्राहक यांच्यात दरवाढीवरून वाद-विवाद सुरू आहेत. ग्राहक व्यापाऱ्याला दोष देतो. व्यापारी शासनाला दोष देऊन महागाईविरोधात रोष व्यक्त करीत आहेत.

इंधन दरवाढ हे निश्चितच चिंताजनक आहे. महागाईच्या दुष्टचक्रात गोरगरीब अधिकच भरडला जातो. आवक कमी व खर्च अधिक असल्याने कुटुंब चालकाला आर्थिक गाडा हाकलण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाद्यतेलाच्या किमतीबाबत विचार केला असता आपल्या अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तर घरातील गॅस सिलिंडर शोभेची वस्तू झाली आहे. महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rising inflation has crippled the public's budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.