मोहगावातील रोहयो कामे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:52 AM2019-04-01T00:52:48+5:302019-04-01T00:53:21+5:30
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या मोहगाव (खदान) गावात रोहयो अंतर्गत शेतशिवारात करण्यात आलेली कामे अव्वल असल्याची पावती कृषी विभागाचे पथकाने दिली आहे. या गावात मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या मोहगाव (खदान) गावात रोहयो अंतर्गत शेतशिवारात करण्यात आलेली कामे अव्वल असल्याची पावती कृषी विभागाचे पथकाने दिली आहे. या गावात मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आलेली आहे.
दीड हजार लोकवस्तीच्या मोहगाव (खदान) गावात कृषी विभागाचे वतीने शेतकऱ्याचे शेत शिवारात रोहयो अंतर्गत भातखाचरे, मजगीचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात ७ हेक्टर आर हून अधिक क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. मजुरांना कामे उपलब्ध करणारी योजना म्हणून या योजनेकडे बघितले जात आहे. परंतु अलीकडे या योजनेत जेसीबी मशीनचा उपयोग वाढला आहे. यामुळे मजुरांचे हातातून कामे निसटली जात आहे. परिसरात रोहयो कामाचा दुष्काळ असताना मोहगाव (खदान) गावात नियोजनबद्ध रितीने मजुरांचे हाताला कामे उपलब्ध २कण्यात आली आहे. कृषी विभाग आणि पाणलोट समिती यांचे संयुक्त निदर्शनात करण्यात येणाºया रोहयो कामावर सरपंच उमेश कटरे यांनी नियंत्रण ठेवले आहे. या गावात भातखाचरे आणि मजगीचे कामे प्रलंबित होती. या योजनेअंतर्गत कामे पूर्ण करण्यात आली आहे. मजुरांचे हाताने या गावात करण्यात आलेली कामे लक्ष वेधत आहेत. ७ हेक्टरहून अधिक क्षेत्रात करण्यात आलेल्या कामाची पाहणी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आणि तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, पारधी, ठाकरे, वळवी व फासे यांचे पथकाने केली आहे. या पथकाने पानलोट समिती तथा कृषी विभागाचे कार्यावर समाधान व्यक्त केले आहे. मजुरांचे मार्फत करण्यात आलेली कामे योग्य पद्धतीने होत असल्याचे शेतकरी आनंदीत झाले आहे.
या गावात उर्वरीत शेतीचे रोहयो अंतर्गत पुन्हा भातखाचरे व मजगीचे कामे केली जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी सांगितले. या शिवाय योजनेत जलद गतीने निधी उपलब्ध केल्यास कामांना गती दिली जाईल. परंतु निधी अभावी योजना प्रभावित ठरत असल्याचे सरपंच उमेश कटरे यांनी सांगितले.