लाखनी शहरातील मेमन हॉल ते मुरमाडी, सावरी, सिंधी लाईन आणि परत मेमन हॉल या मार्गाने सद्भावना रॅली काढण्यात आली होती. मेमन हॉल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजीव गांधी यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. देश घडवण्यामध्ये, देशामध्ये नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञान आणण्यामध्ये त्यांचे योगदान हे मौल्यवान होते. त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देण्यासाठीदेखील त्यांनी स्वतः कष्ट घेतले आणि युवकांना अनेक अधिकार त्यांनी दिले, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या रॅलीमध्ये तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, ज्येष्ठ नेते शफीभाई लद्धानी, शहर अध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, जयकृष्ण फेंडरकर, आकाश कोरे, रुपलता जांभुळकर, ज्ञानेश्वर रहांगडाले, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष रवी भुसारी, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी सभापती खुशाल गीदमारे, माजी उपसभापती मोरेश्वरी पटले, महादेव गायधनी, सुनंदा धनजोडे, संध्या धांडे, पंकज श्यामकुवर, प्रिया खंडारे, धनपाल बोपचे, नितीन भालेराव, इंटकचे प्रदीप मेश्राम, युवक काँग्रेसचे मोहन निर्वाण, महेश वनवे, भैरव सारवे, वसंत मेश्राम अंबर येटरे, कैलास लुटे, सुभाष मोहनकर, बापू डोरले, श्यामा बेंदवार, रूपचंद भेंडारकर, मंगेश गोटेफोडे, नवनीत रहेले, प्रकाश गोटेफोडे, विलास मेश्राम, विश्वनाथ बेंदवार, देवचंद बेंदवार, फागो बेंदवार, भरत रहेले, गणेश बोडनकर, अनिल बोडनकर, जनार्दन गभने, हेमंत बांडेबुचे, सुनील पटले, रूपचंद सोनवणे, मंगेश धांडे, सचिन बागडे, सीमा बनसोड, सविता गौरे, चंदन अंबादे, पुरुषोत्तम रामटेके, सेवादलचे शहर अध्यक्ष अनील बावनकुळे, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रितेश कांबळे, सोमनाथ बोरकर, योगेश झलके, हितेश निर्वाण, भूपेश शेंडे, दशरथ मेश्राम, नंदलाल चौधरी, शिवशंकर मांढरे, देवदास मेहेर, सुरेश बुरडे, सुनील बांते, हरिभाऊ पडोळे, दिवाकर बांते, प्रकाश कानतोडे, केशव बोळणे, अनिकेत गोस्वामी, पद्माकर पवार, प्रमोद दोनोडे आदी उपस्थित होते.
220821\img-20210820-wa0146.jpg
photo