गावकऱ्यांनी रोखले रेतीचे ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:17+5:30
नदीघाटावरील रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला प्रशासनाची रितसर मान्यता आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. त्यामुळे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गावकऱ्यांना या रस्त्यातून जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान शुक्रवारी ग्रामस्थांनी रेतीचे ट्रक अडविले. ट्रकची मोठी रांग लागली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. वारंवार विनंती करूनही या वाहतुकीला प्रतिबंध घातला जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तुमसर तालुक्यातील सुकळी येथील नागरिकांनी शुक्रवारी रेतीचे ट्रक अडविले. या प्रकाराची माहिती होताच पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
सुकळी (दे.) गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदीघाटावरील रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला प्रशासनाची रितसर मान्यता आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. त्यामुळे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गावकºयांना या रस्त्यातून जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.
दरम्यान शुक्रवारी ग्रामस्थांनी रेतीचे ट्रक अडविले. ट्रकची मोठी रांग लागली होती. या प्रकाराची माहिती होताच महसूल व पोलीस विभागातीम कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक वाहतुकीमुळेच रस्ता खड्डेमय झाल्याचा आरोप सरपंच भाऊलाल बांडेबुचे यांनी केला.
गत काही दिवसांपासून रेतीची उचल वाहतूक सुरू आहे. परंतु ग्रामपंचायतीला साधे पत्र दिले नाही. याबाबत ग्रामपंचायत अनिभिज्ञ आहे. रेती वाहतुकीमुळे ग्रामस्थात तीव्र रोष असून भरधाव वाहतुकीमुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही.
सर्वसामान्य नागरिकांनी घाटातून रेती काढली तर कारवाई करण्यात येते. क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक सुरू असूनही प्रशासन कारवाई करीत नाही.
-भाऊलाल बांडेबुचे, सरपंच सुकळी.