स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरंभीत स्वच्छता श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:03+5:302021-09-19T04:36:03+5:30
भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने ...
भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा होत आहे. या अमृत महोत्सवाचा जिल्हा आणि तालुकास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ कोरंभी येथे उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संघमित्रा कोल्हे, भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नूतन सावंत, सरपंच हेमंत राखडे, उपसरपंच मनोहर नागदेवे, कृषी अधिकारी झोडपे, सचिव एस. ए. वैद्य, कक्ष अधिकारी तरोणे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शालू आकरे, सहायक शिक्षक राहुल मेश्राम, कृषी विस्तार अधिकारी गजभिये, साखरे, महिला बालविकास अधिकारी निपसे, जिल्हा कक्षाचे सल्लागार अजय गजापूरे, अंकुश गभने, राजेश येरणे, प्रशांत फाये, बबन येरणे, गजानन भेदे, निखिल वंजारी, उषा वाडीभस्मे, देवेंद्र खांडेकर, महिला बचत गट संघाच्या अध्यक्षा पूनम सार्वे, ग्रामपंचायत सदस्या नलिनी नागदेवे, माया लुटे, अंगणवाडी सेविका शारदा तिजारे, आशा सेविका मंदार मंदा सर्वे, पुष्पा नेवारे, महिला बचतगटाच्या कोमल नागदेवे, संघमित्रा नागदेवे, गट संसाधन केंद्राचे (पाणी व स्वच्छता) नागसेन मेश्राम, स्मृती सुखदेवे यांची उपस्थिती होती.
बॉक्स
पिंगलाई देवस्थान परिसरात प्लास्टिकच्या कचऱ्याचे संकलन
कोरंभी येथे स्वच्छता श्रमदान जिल्हा आणि तालुकास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभाप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संघमित्रा कोल्हे, गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी स्वतः ग्रामपंचायत परिसर, बौद्ध विहार, हनुमान मंदिर, शिवाजी सार्वजनिक चौक, प्राथमिक शालेय परिसराची स्वच्छता करण्यात केली. याठिकाणी परिसर स्वच्छता करूनच कचरा संकलन करण्यात आला. तसेच इतरत्र पडून असलेला प्लास्टिक कचरा गोळा करून त्यानंतर पिंगलाई देवस्थान परिसरात प्लास्टिकच्या कचऱ्याचे संकलन व परिसराची स्वच्छता करण्यात आली. श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, बचतगटाच्या महिला आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागारांनी सहकार्य केले.