शिष्यवृत्ती परीक्षा ह्या अधिकारी बनण्याचा हमखास मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:24+5:302021-02-05T08:38:24+5:30

सिहोरा येथील युगांधर युवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाद्वारे आयोजित राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत ...

Scholarship exams are a great way to become an officer | शिष्यवृत्ती परीक्षा ह्या अधिकारी बनण्याचा हमखास मार्ग

शिष्यवृत्ती परीक्षा ह्या अधिकारी बनण्याचा हमखास मार्ग

Next

सिहोरा येथील युगांधर युवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाद्वारे आयोजित राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तुमसरचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षतेस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेंद्र तुरकर होते. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, सामाजिक कार्यकर्ते योगराज टेभरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. अशोक पटले, इंद्रपाल सोलकी, रामेश्वर मोटघरे, विकास बिसने, मनोज टेभरे, आश्रम शाळा अधीक्षक जामुवंत बनकर, युगांधर समूहाचे अध्यक्ष शरद खेताडे आदी उपस्थित होते. या वेळी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणारे ६ विद्यार्थी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करणारे १२ विद्यार्थी, राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करणारे ४ विद्यार्थी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करणारे पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या समारोहात विद्यार्थ्यांकरिता भाषण स्पर्धा आणि गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गीतगायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक दानिया सैयद, दुसरे पारितोषिक सोनल कटरे तर तिसरे पारितोषिक खुशबू येळे तसेच यशस्वी बुरडे हिने पटकाविले आहे. भाषण स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दृष्टी शरणागत हिने पटकाविले आहे. सर्व विजेत्यांना मुख्याध्यापक भालेश्वर शरणागत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष बोरकर, सतीश चौधरी, मेघराज हेडाऊ, अरविंद पटले यांच्या हस्ते देण्यात आले.

सूत्रसंचालन मंगेश शहारे, जीवन चौधरी यांनी केले. तर आभार प्रकाश हेडाऊ यांनी मानले. कार्यक्रमाकरिता युगांधर समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Scholarship exams are a great way to become an officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.