भंडारा जिल्हा मुख्याघ्यापक संघ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बँकेच्या दालनात भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा यांची बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्यांबाबत जिल्ह्यातील सर्व शालेय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्याकरिता व सॅलरी पॅकेजमधील विविध सुविधांवर चर्चा करून मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या. वैयक्तिक अपघात विमा २० लक्षवरून २५ लक्ष रुपये करण्यात आला. बँकेच्या एटीएम केंद्रावर दैनिक ४० हजार रुपये काढण्याची सुविधा, नि:शुल्क आरटीजीएस आणि एनईएफटीची सुविधा, एटीएम कार्ड व वार्षिक देखभाल खर्च नि:शुल्क, लॉकर भाड्यात १५ टक्के कपात, शून्य बॅलन्स वेतन खाते उघडणे, चारचाकी वाहन कर्ज ९ टक्के व्याजदराने उपलब्ध, ओडी कर्जमर्यादा १ लक्ष रुपये बँकेच्या व्याजदराच्या ०.५० टक्का कमी दराने, पुढील काळात नियमित पगार, तारण कर्जावरील व्याजदर अजून कमी करण्याचे आश्वासन बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सभेला दिले.
सभेला बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, जिल्हा कार्यवाह विमाशि भंडारा, राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष विमाशि भंडारा सुधाकर देशमुख, अर्चना बावणे, अनंत जायभाये, दामोदर काळे, राजू भोयर, सुनीता तोडकर, मनोहर कापगते, नितीन तोडकर, राधेश्याम धोटे, परिहार, विलास जगनाडे, हलमारे आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी सभेला उपस्थित होते.