लाच घेताना वरिष्ठ लिपिक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:52 AM2019-07-25T00:52:15+5:302019-07-25T00:52:51+5:30

सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतनातील हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ईसराम पटले याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.

Senior clerk in a bribe while taking bribe | लाच घेताना वरिष्ठ लिपिक जाळ्यात

लाच घेताना वरिष्ठ लिपिक जाळ्यात

Next
ठळक मुद्देजिल्हा कोषागार कार्यालयातील प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतनातील हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ईसराम पटले याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सेवाकाळातील म्हणजे १ आॅगस्ट २००१ पासून आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ पदोन्नती साखळींतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करण्यात आली. तसेच त्याची थकबाकी व सहाव्या वेतन आयोगाचे पाच हप्त्यातील असे एकूण ११ लाख ६३ हजार ४९० रुपयांचे देयक जिल्हा कोषागार कार्यालय येथे प्रलंबित होते. सदर प्रलंबित असलेले बिल वरिष्ठांकडे तपासून मंजुरीकरिता सादर व बिल काढून देण्याकरिता वरिष्ठ लिपीक प्रकाश पटले याने तक्रारदाराला पाच हजार रुपयांची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १५ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदविली. सापडा रचून बुधवारला प्रकाश पटले याला पाच हजार रुपयांची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, हवालदार धनंजय कुरंजेकर, सचिन हलमारे, पराग राऊत, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, सुनील हुकरे, दिनेश धार्मिक आदींनी केली.

Web Title: Senior clerk in a bribe while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.