आमरण उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:32 PM2018-10-25T22:32:52+5:302018-10-25T22:33:32+5:30
तलावाची पाळ फुटून सिंदपूरी गावात पाणी शिरले होते. सुमारे चार वर्षापासून बेघराला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्या विरोधात अन्यायग्रस्ताने सिंदपुरी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल जि.प. सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी तात्काळ घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तलावाची पाळ फुटून सिंदपूरी गावात पाणी शिरले होते. सुमारे चार वर्षापासून बेघराला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्या विरोधात अन्यायग्रस्ताने सिंदपुरी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल जि.प. सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी तात्काळ घेतली. जि.प. चे सभापतीसह उपोषणस्थळी भेट दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
सिंदपूरी येथील रामचंद्र मधुकर खडसे यांचे सन २०१४ मध्ये तलावाच्या पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. एकूण ६७ बाधीतांची यादी तहसीलदार व बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राज्य शासनाला मंजूरीकरिता सादर केले. परंतु घरकुल मंजूर झाले नाही. त्यावेळी सरपंच पारधी, उपसरपंच देवानंद वासनिक, विनोद मोरे तथा ग्रामस्थांनी पं.स. तुमसर समोर उपोषण सुरु केले होते हे विशेष.
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्याकरिता रामचंद्र खडसे यांनी २३ आॅक्टोबरला आमरण उपोषण सुरु केले. जि.प. सदस्या प्रतिक्षा उमेश कटरे, जि.प. सभापती धनेंद्र तुरकर, रेखाताई ठाकरे यांनी प्रकल्प अधिकारी मनिषा कुरसुंगे यांचेशी चर्चा करुन उपोषणस्थळी भेट देऊन समस्या सोडविण्याबाबत सांगितले.
खडसे यांना सन २०१९-२० मध्ये यांचे नाव यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले. लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी जि.प. सदस्या प्रतिक्षा कटरे, जि.प. सभापती धनेंद्र तुरकर, रेखाताई ठाकरे, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, देवचंद ठाकरे, विनोद मोरे, सरपंच गायधने, उपसरपंच देवानंद वासनिक, ग्रा.पं. सदस्य दिनेश उरकुडे, अनिल शहारे, सुनिता निकुडे, वैशाली गजभिये सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.