सांडपाण्यामुळे गोवर्धन नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:34 AM2021-04-15T04:34:12+5:302021-04-15T04:34:12+5:30
शहरातील गोवर्धन नगरातून जाणारा नाला सांडपाण्यामुळे भरलेला आहे. या नाल्यातून पाण्याची निकासी होत नाही. त्यामुळे नाल्यात पाणी साचले राहते. ...
शहरातील गोवर्धन नगरातून जाणारा नाला सांडपाण्यामुळे भरलेला आहे. या नाल्यातून पाण्याची निकासी होत नाही. त्यामुळे नाल्यात पाणी साचले राहते. परिसरात ६० ते ७० घरे आहेत. या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. सदर नाल्याची स्वच्छता करावी असे निवेदन व माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले;. परंतु अद्यापपावेतो यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
गोवर्धन नगरातून जाणारा नाल्यातील पाणी पुढे रेल्वेच्या रिकाम्या भूखंडावर जमा होते. अनेक महिन्यापासून सदर पाणी तिथेच जमा होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तिथे साचले आहे. साचलेल्या पाण्याची निकासी होत नाही. त्यामुळे रिकाम्या भूखंडावर पाणी जमा राहते. सदर भूखंड रेल्वेचास असल्यामुळे त्यावर पालिकेला कारवाई करण्याकररता रेल्वेची ना हरकत घ्यावी लागते. कायमस्वरूपी इथे पाण्याची निकासी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या परिसरात डासांच्या मोठा प्रादुर्भाव होतो यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेने सदर समस्येची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.