लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून करा, खावी लागू शकते जेलची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:16+5:302021-09-12T04:40:16+5:30
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. उत्सुकता म्हणून त्या ...
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. उत्सुकता म्हणून त्या आपण पाहतो आणि इतरांनाही त्यात सहभागी करून घेण्यासाठी कोणतीही खात्री न करता फाॅरवर्ड करतो. माहितीही सत्यता पडताळून शेअर केली तर लोकांना चांगली माहिती मिळू शकते. सोशल मीडिया हे आता दुधारी शस्त्र झाले आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करणे गरजेचे आहे. मात्र, चांगल्या कामापेक्षा सोशल मीडियाचा अलीकडे गैरवापर केल्याचे दिसून येते. वादग्रस्त मॅसेज शेअर करून आपण आफत ओढवून घेऊ शकतो.
बॉक्स
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती शेअर करू नये. आपण माहिती शेअर केल्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याचा विचार करावा. सोशल मीडियातून झटपट माहिती पोहोचल्याने अनेक गैरप्रकार घडल्याची उदाहरणे आपल्याकडे ताजी आहेत.
अशी घ्या काळजी
अर्धवट ज्ञान नेहमी घातक असते. अनेकदा पटकन माहिती शेअर करण्याच्या नादात चुकीची माहिती शेअर केली जाते. हा सोशल मीडियाचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे.
प्रायव्हसी सेटिंग योग्य प्रकारे सेट करूनच नंतरच आपले फोटो किंवा मॅसेज शेअर केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला ब्लाॅक करण्याचा पर्याय व्हाॅटस्ॲपवर उपलब्ध आहे.
अनेकदा जाती-धर्माचे ग्रुप तयार केले जातात. त्यामध्ये वादग्रस्त मॅसेज शेअर करून तरुणांना भडकविले जाते. काही तरुण बळी पडतात. यापासून सावध असावे.
बॉक्स
मुलींनो डीपी सांभाळा
काॅलेजला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतो. अनेक विद्यार्थी तासन् तास फोनवर बोलतात. माहितीचे आदानप्रदान करतात. परंतु खास करून मुलींनी सोशल मीडियाचा वापर सांभाळून केला पाहिजे. डीपीवर आपला फोटो ठेवताना तो साजेसा आणि सुसंस्कृत असा असावा. भडक फोटो आपल्याला संकटात नेऊ शकते. पालकांनीही मुलींच्या डीपीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा बदनामीची भीती असते.
कोट
सोशल मीडियावरून येणाऱ्या माहितीची खात्री करून घ्यावी. आक्षेपार्ह कोणतीही माहिती शेअर करू नये. कुणाचे मन दुखावेल, कुणाची बदनामी होईल असे कोणतेही मॅसेज, फोटो सोशल मीडियातून शेअर अथवा लाईक करू नये. सोशल मीडियाचा योग्य वापर करावा.
-भूषण पवार, सायबर विभागप्रमुख