बालकावर धारदार शस्त्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:59 PM2019-01-23T22:59:38+5:302019-01-23T22:59:56+5:30
घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ११ वर्षीय बालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील गोवर्धन नगरात घडली. गंभीर जखमी बालकावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ११ वर्षीय बालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील गोवर्धन नगरात घडली. गंभीर जखमी बालकावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमन सैय्यद (११) रा.गोवर्धन नगर तुमसर असे जखमी बालकाचे नाव आहे. त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या सोहिल रायनी रा.उत्तर प्रदेश याने धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी केला हे मात्र कळू शकले नाही. मुळचा उत्तर प्रदेशातील सोहिल हा तुमसर शहरात पीओपीचे काम करतो. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोणतेही कारण नसताना त्याने अमनवर धारधार शस्त्राने वार केले. त्याच्या हातावर वार होताच तो जोराने ओरडला. त्यानंतर हनुवटीवरही वार करण्यात आले. या मुळे अमन रक्ताच्या थारोळ्यात कोसळून बेशुद्ध झाला. तर सोहिलने तेथून पळ काढला. तात्काळ तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमी अमनला दाखल करण्यात आले. त्यानंतर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तसेच सोहिलला ताब्यात घेतले.