शिवभोजन ठरले वृद्ध निराधारांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:57+5:302021-03-13T05:03:57+5:30
साकोली : येथे शासनाकडून सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी आता काही महिन्यांपासून वृद्ध निराधारांचा आधार बनली असून, दिशा फाऊंडेशनच्या ...
साकोली : येथे शासनाकडून सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी आता काही महिन्यांपासून वृद्ध निराधारांचा आधार बनली असून, दिशा फाऊंडेशनच्या संचालिका सरिता फुंडे यांनी याठिकाणी वृद्ध, अपंग, निराश्रितांना विनामूल्य भोजन देण्याचे निर्देश दिले आहेत, असे शिवभोजनचे व्यवस्थापक क्रिशाल फुंडे यांनी सांगितले.
येथील शिवभोजन केंद्रात भेट दिली असता, गुढरी-सानगडी येथील रायवंता मंगरू तिरपुडे ही भोजन घेत होती. ती म्हणाली, ‘माझी मुले नागपूरला असून, मी व वृद्ध पती दोघेच लहानशा झोपडीत राहतो. साकोलीत आल्यावर शिवभोजन थाळी घेऊन जेवण करतो. मला आजपर्यंत येथील लोकांनी जेवणाच्या पैशांबद्दल विचारले नाही.’ दिशा फाऊंडेशनच्या या अभिनव उपक्रमामुळे साकोली शहरातील शिवभोजन केंद्र हे वृद्ध व निराधारांचा आधार बनले आहे.