नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:35+5:302021-05-27T04:36:35+5:30
गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला बनणाऱ्या नाल्यांचे कामे आता बंद असून जिथपर्यंत ही कामे झाली आहेत तेथे मात्र चिंताजनक ...
गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला बनणाऱ्या नाल्यांचे कामे आता बंद असून जिथपर्यंत ही कामे झाली आहेत तेथे मात्र चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे आणि यावर आता ही जर योग्य प्रकारे काम नाही झाले तर मग येणाऱ्या पावसामुळे गावाच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी साचल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी कोण स्वीकार करणार. महामार्गाच्या दोन्ही बाजूला अर्धवट बनलेल्या नाल्या पूर्ण का नाही असा प्रश्न सर्वांना पडला असेल पण वास्तविक स्थिती उलट असून याचाही विचार आता करणे गरजेचे झाले आहे पण कुणी करायला हवा. ग्रामस्थांनी ,ग्रामपंचायत प्रशासनाने की कंत्राटदाराने हाही एक प्रश्न इथे उपस्थित होतो आहे.
नाल्यांचे अर्धवट बांधकाम हे ग्रामस्थांच्या घराजवळ येऊन थांबले आहेत यामुळे येणाऱ्या पावसात घराला आणि जीवाला सुद्धा धोका तर होऊ शकतो पण आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण जर होत असेल तर मग ग्रामस्थांनी काय करायचे, याचा संबंधित कंत्राटदार व प्रशासनाने तत्काळ विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशीही मागणी ग्रामस्थांची आहे
ग्रामस्थांना अशोकनगर लगत असणाऱ्या पेट्रोल पंप जवळ साचलेल्या पाण्याचा विचार यासाठी होतो आहे की भर उन्हात ही स्थिती आहे तर पुढे येणाऱ्या पावसात यापेक्षा मोठी समस्या निर्माण होऊ शकते तसेच गावातील काही घरांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही अशा बिकट परिस्थितीत जर एखादी नुकसान झाले तर संबंधित विभाग, प्रशासन की ग्रामस्थ नुकसान भरपाईची हमी घेणार का असेही ग्रामवासीयांनी मत व्यक्त केले आहे.
कोट बॉक्स
सदर पाण्याची विल्हेवाट संबंधित कंत्राटदाराने योग्य मार्गाने करणे गरजेचे आहे तेव्हाच येथील समस्या सुटणार.
नंदलाल मेश्राम ग्रामवासी अडयाळ घरापर्यंत नाली बनून एक महिना झाला. पुढचे काम कंत्राटदाराने केले नाही. पावसाळ्यात जर घराला तथा जीवाला धोका झालंच तर मग जबाबदारी कुणाची.
लोमेश नान्हे, ग्रामवासी अडयाळ