समाजाला कर्तृत्ववान महिलांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:04 AM2021-03-13T05:04:22+5:302021-03-13T05:04:22+5:30
तुमसर येथील जनता विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलांचा सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राजू गणे, ...
तुमसर येथील जनता विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलांचा सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राजू गणे, पंकज बोरकर, मेश्राम, मंगला बोरकर उपस्थित होते.
कल्याणी भुरे म्हणाल्या, महिलांचे क्षेत्र चूल व मूलएवढेच मर्यादित नाही. महिलांनी आज अनेक नवीन क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. विद्यार्थीदशेपासूनच मुलींनी समाजकार्याचे धडे घेणे आवश्यक आहे. महिला शिक्षित झाल्या, तर संपूर्ण समाज शिक्षित होण्यास हातभार लागेल. ग्रामीण असो वा शहरी, सर्वत्र महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. गावातील ग्रामपंचायतीपासून, तर देशाच्या संसदेपर्यंत महिलांनी मजल गाठली आहे. आज समाजाला कर्तृत्वत्वान महिलांची गरज आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कल्याणीताई भुरे यांनी दिले. आभार नंदा बावनकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राखी विषयी लिंगामध्ये खोब्रागडे, चव्हाण, मंदा गाढवे, शिंदे, आरामे यांनी परिश्रम घेतले.