सभापतिपदी कुथे, उईके, बोरकर, कटकवार यांची वर्णी

By admin | Published: February 15, 2017 12:21 AM2017-02-15T00:21:17+5:302017-02-15T00:21:17+5:30

नगरपरिषद भंडाराच्या सहा सभापतीपदांच्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Speaker of the Kutha, Uike, Borkar, Cuttack in the chair | सभापतिपदी कुथे, उईके, बोरकर, कटकवार यांची वर्णी

सभापतिपदी कुथे, उईके, बोरकर, कटकवार यांची वर्णी

Next

भंडारा नगरपालिकेत निवडणूक : सभापतीचे एक पद काँग्रेसला, स्थायी समितीत राकाँला सदस्यपद
भंडारा : नगरपरिषद भंडाराच्या सहा सभापतीपदांच्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिक्षण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या जयश्री रविंद्र बोरकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी वनिता दिलीप कुथे, नियोजन व विकास समिती सभापतीपदी भूमेश्वरी मनोज बोरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती आशा हरिश्चंद्र उईके व स्वच्छता वैद्यक व आरोग्य समिती सभापतीपदी ब्रिजमोहन फत्तूलाल कटकवार यांची निवड करण्यात आली.
नगरपरिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विजया बनकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या उपस्थितीत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे ही निवड प्रक्रिया ४ वाजता पार पाडली असली तरी सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार हे आधीच निश्चित झाले होते.
भंडारा नगरपालिकेच्या एकुण ३३ नगरसेवकांपैकी भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, काँग्रेसचे ३ तर अपक्ष ४ सदस्य आहेत. यापैकी काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. ७ फेब्रुवारीला अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सात दिवसांनी सभापतीपदाची निवड करण्यात आली.
सभापती पदावर निवड झालेल्या वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, आशा उईके, ब्रिजमोहन कटकवार हे सदस्य भाजपच्या शिक्षण समिती सभापतीपदी वर्णी लागलेल्या जयश्री बोरकर या काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी नियमाप्रमाणे उपाध्यक्ष कवलजितसिंह चढ्ढा यांची निवड करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदाकरिता गीता सुरेश सिडाम यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

स्थायी समितीही गठित
सभापतीपदाच्या निवडीनंतर स्थायी समितीही गठीत करण्यात आली. स्थायी समितीचे सभापतीपद हे पदसिद्ध आहे. त्यामुळे याचे सभापतीपद सुनिल मेंढे यांना मिळाले. सदस्यपदी जयश्री बोरकर, वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, आशा उईके, ब्रिजमोहन कटकवार, दिनेश भुरे, साधना त्रिवेदी तर राकाँचे अ‍ॅड.विनयमोहन पशिने यांची निवड करण्यात आली.

भंडारा शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभापती तसेच नगरसेवकांच्या सहकार्याने भंडाऱ्यातील विकासकामे हाच आमचा मुख्य अजेंडा आहे.
-सुनिल मेंढे,
नगराध्यक्ष, भंडारा.

Web Title: Speaker of the Kutha, Uike, Borkar, Cuttack in the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.