गोंदिया-नागपूर पॅसेंजर लोकल रेल्वे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:36 AM2021-01-23T04:36:00+5:302021-01-23T04:36:00+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी छोटे-मोठे उद्योगधंदे, दुकाने, कंपन्या आदी कार्यालये सुरू झाले आहेत. परिस्थिती आताहळू हळू पूर्वपदावर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी छोटे-मोठे उद्योगधंदे, दुकाने, कंपन्या आदी कार्यालये सुरू झाले आहेत. परिस्थिती आताहळू हळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच आता कोरोनाची लसही उपलब्ध झाली आहे. परंतु आजही सामान्य व मजूर वर्गातील प्रवाशांना लोकलचे दरवाजे बंदच आहेत. त्यामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, मजूरवर्ग तसेच सामान्य नागरिकांना कामासाठी नागपूरसारख्या मोठ्या शहरात कामावर जाता येत नाही. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला गावातच विकावा लागत आहे. येथून हजारो लिटर दूध नागपूरला दररोज पाठविले जात होते, ते तसेच पडून आहे. आजघडीला पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने खासगी वाहनाने नागपूरवरून ये - जा करणे परवडणारे नाही. परिणामी कामानिमित्त नागपूरला येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नियमावली निश्चित करून लोकलसेवा पूर्ववत करण्यासंबंधी रेल्वे प्रशासनाला निर्देश देवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.