राज्यमहामार्ग बांधकाम ठरले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:19+5:302021-03-19T04:34:19+5:30

: जलवाहिनी, केबल व शेतपिकांचे प्रचंड नुकसान लाखांदूर : सदोष गौण खनिजांचा वापर करून जलदगतीने राज्य महामार्ग बांधकामाच्या नादात ...

State highway construction became a headache | राज्यमहामार्ग बांधकाम ठरले डोकेदुखी

राज्यमहामार्ग बांधकाम ठरले डोकेदुखी

Next

: जलवाहिनी, केबल व शेतपिकांचे प्रचंड नुकसान

लाखांदूर : सदोष गौण खनिजांचा वापर करून जलदगतीने राज्य महामार्ग बांधकामाच्या नादात गत काही महिन्यात तालुक्यात अपघाताच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइनची झालेली तोडफोड , टेलिफोन व इंटरनेट सेवेच्या केबलची नासधूस व शेतपिकांचे झालेले नुकसान आदी सर्व घटनांनी तालुक्यातील जनता जाम वैतागली असून, आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत असून, सदर बांधकाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्याचे बोलल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, गत वर्षभरापूर्वीपासून साकोली-वडसा या २६६ कोटी रुपये निधीच्या राज्यमहामार्गाचे बांधकाम प्रगतीत आहे.

सदर बांधकाम एका लोकप्रतिनिधीच्या बांधकाम कंपनी अंतर्गत केले जात असल्याने सदर बांधकामाला राजाश्रय असल्याचे बोलले जात आहे. या राजाश्रयाचा लाभ उचलीत सदर महामार्ग बांधकामात सदोष गौण खनिजांचा वापर केला जात असल्याचा आरोप जनतेत केला जात आहे. तथापि, सदर बांधकाम होताना या मार्गावरील प्रवासी नागरिकांना वाहतुकीदरम्यान अपघातापासून बचावासाठी आवश्यक उपाय योजना न करण्यात आल्याने या मार्गावरील अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.

दरम्यान, या मार्गाचे बांधकाम करण्यासाठी ठिकठिकाणी जेसीबी यंत्राने खोदकाम करताना केबलची नासधूस अनेकदा तालुक्यातील टेलिफोन, इंटरनेट सेवा खंडित झाल्याचे बोलल्या जात आहे.

सदर सेवा खंडित होऊन तालुक्यातील शेतकरी, नागरिक, व्यापारी, उद्योजक, अधिकारी व कर्मचारी आवश्यक सोयीअभावी नसल्याने प्रचंड वैतागले असल्याचीदेखील ओरड आहे. या महामार्ग अंतर्गत पूल बांधकाम होताना उन्हाळी धान पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून सोडले जाणारे पाणी प्रारंभी अडवून एकावेळी शेतात सोडल्याने तालुक्यातील सोनी येथील दोन शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची ओरड आहे.

दुसरीकडे अंतरगावजवळ रस्त्याचे खोदकाम करताना पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन तब्बल दोनदा फुटल्याने या गावात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाल्याने येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहेत.

Web Title: State highway construction became a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.