शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

राज्यस्तरीय बाह्य मूल्यांकनास जिल्ह्यातील दोन शाळांची निवड

By admin | Published: March 23, 2016 12:45 AM

राज्यस्तरीय शाळा मुल्यांकनासाठी जिल्हा परिषदच्या दोन शाळांची निवड करण्यात आली आहे.

हिंगणा, खराशी शाळेचा समावेश : २८ मार्चला निर्धारक पथक येणारमोहन भोयर भंडाराराज्यस्तरीय शाळा मुल्यांकनासाठी जिल्हा परिषदच्या दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. यात तुमसर तालुक्यातील हिंगणा व लाखनी तालुक्यातील खराशी शाळांचा समावेश आहे. या दोन्ही शाळांच्या तपासणीसाठी २८ मार्च रोजी बाह्य निर्धारक शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक अभिलेखे आदींची तपासणी करण्यासाठी एक समिती दाखल होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक करणे व आधुनिक काळात इंग्रजी शाळात स्पर्धा निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा आपणही कमी नाही. हा उद्देश समोर ठेवून या शाळांनी नव्याने वाटचाल सुरु केली आहे. लोकसहभागातून वर्गणी गोळा करून संगणक खरेदी करण्यात आले. एका वर्षात हिंगणा येथील शाळेचा चेहरामोहरा बदलून गेला. विद्यार्थी बचत गटात आठ महिन्यात २० हजार रुपये जमा करण्यात आले.हिंगणा या गावाची लोकसंख्या १,३०३ इतकी असून गावाच्या मध्यभागी पाच हजार चौरास फुटात देखणी इमारत उभी आहे. हिरवळ व लहान उद्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गावात १९५४ मध्ये शाळा सुरु झाली होती. १ ते ८ वर्ग असून ६७ विद्यार्थिनी व ७१ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. कॉन्व्हेंटसारख्या गणवेश येथील विद्यार्थ्यांचा आहे. ज्ञानरचनावाद उपक्रम येथे राबविण्यात येत असून मुख्याध्यापक एस.टी. पारधी व इतर पाच शिक्षक येथे कार्यरत आहे. लाखनी तालुक्यातील खराशी शाळेचा आदर्श घेऊन या शाळेने आठ महिन्यापूर्वी वाटचाल सुरु केली. आठ महिन्यानंतर राज्यातील ६२ शाळेत या शाळेने स्थान पटकाविले हे विशेष. खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांनी या शाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले होते.हिंगणा येथील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा शैक्षणिक अभिलेखे व इतर सर्व सुविधा उपलब्ध असून विद्यार्थी सुद्धा अपडेट आहेत. राज्यस्तरीय बाह्य मुल्यांकनाकरिता निवड होणे ही आमच्याकरिता अभिमानाची बाब आहे.-विजय आदमनेवरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, तुमसरजिल्ह्यातील दोन शाळांची राज्यस्तरीय शाळा मुल्यांकनासाठी निवड झाली आहे. खराशी व हिंगणा या शाळांनी अन्य शाळांसमोर आदर्श घातला आहे. दोन्ही शाळांची शैक्षणिक प्रगतीचा राज्यस्तरीय शाळा मुल्यांकन समिती योग्य अहवाल राज्य शासनाकडे सादर करेल.-किसन शेंडेशिक्षणाधिकारी, भंडारा.