तुमसरच्या नगराध्यक्षाचे प्रधान सचिवांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:57+5:302021-08-27T04:38:57+5:30
तुमसर : स्थानिक नगर परिषद तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्यासोबत मुंबई येथे ...
तुमसर : स्थानिक नगर परिषद तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्यासोबत मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्राचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याशी भेट घेऊन तुमसर शहरातील विविध विषयांवर चर्चा केली व समस्यांबाबतचे निवेदन देऊन तत्काळ समस्या मार्गी लावण्याची विनंती केली.
नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी निवेदनातून नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या तुमसर शहराची हद्दवाढ करणे तसेच नगर परिषद तुमसरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात घालण्यात येणाऱ्या उरलेल्या १३ किलोमीटरच्या पाइपलाइनला मंजुरी प्रदान करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थींना उर्वरित अनुदान तत्काळ द्यावे, नगर परिषद अंतर्गत शहरातील विकासात्मक विविध कामे करण्याकरिता अनुदान मिळणे व नगर परिषद तुमसरमध्ये नियमित मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.