पालांदूर : पावसाने मनसोक्त हजेरी लावल्याने सर्वदूर रोवणी सुरू झालेली आहे. रोवणी धडाक्यात सुरू झाल्याने मजूरटंचाईचा सामना नित्याप्रमाणे शेतकऱ्याला करावा लागत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सरळ रेषेत पूर्वपश्चिम रोवणी अंतर मशागतीला फायदेशीर ठरते आहे.
लाखनी तालुक्यात सुमारे २३ हजार हेक्टरवर धान नियोजित आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १०,५०० हेक्टरवर रोवणीचे गणित सुरू झालेले आहे. अगदी नियोजित वेळेत हंगाम सुरू झालेला आहे. पावसाने अशीच साथ दिल्यास जुलै महिन्यात संपूर्ण रोवणीच हंगाम आटोपण्याची आशा दिसत आहे. हुंडा पद्धतीत ३२००, तर मजुरीचे दर१५० रुपयांच्या पुढे सुरू आहेत. सर्वप्रथम हलक्या धानाची रोवणी मिळेल त्या परिस्थितीत सुरू झालेली आहे. चूलबंद खोऱ्यात नदी-नाले प्रवाहित झालेले आहेत. त्यामुळे विहिरी, बोअरवेल्स व फिल्टरना अपेक्षित पाणी सुरू झालेला आहे. पावसाने अशीच साथ दिल्यास अपेक्षित वेळी हंगाम पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे.
खताच्या मात्रा शिफारशीनुसार शेतकरी देत आहे. \Iतात्पुरत्या स्वरूपात वाढीव दराचा फटका विश्रांतीत आहे.\I खतांची किंमत शेतकऱ्यांना डोईजड होणार आहे. वाढीव दराच्या नियोजनाने धानाचे भाव मात्र वाढलेले नाहीत. तसा नफा-तोटा याचा विचार केल्यास धानाची शेती तोट्याचीच जात आहे. परंतु बोनसच्या आधारे शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी थोडाफार तरतो आहे.
बॉक्स
उन्हाचा असह्य त्रास
पावसाळा झाली सुरू असला तरी मे हीटची आठवण होत आहे. रात्रीसुद्धा नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. मान्सून संथ असल्याने पाऊस नियमित पडत नाही. दिवसभरात दोन ते चार शिरवे कमी-जास्त स्वरूपात असल्यास वातावरणात गारवा तयार होऊन उकाडा कमी होतो; परंतु निसर्गाच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. त्यामुळे मिळेल त्या परिस्थितीत शेतकरी राजा मजुराच्या सोबतीने रोवणी आटोपत आहे.
कोट
पारंपरिक पद्धतीने रोवणी करण्यापेक्षा थोड्याशा नव्या पद्धतीचा आधार देऊन रोवणी केल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ शक्य आहे. दोरीने रोवणी केल्यामुळे डवरन, खत देणे, नींदन काढणे करिता सोयीचे होते. नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा पूर्व पश्चिम असते. त्याकरिता दोरीची रोवणी पूर्व-पश्चिम करावी. पट्टा पद्धतीचासुद्धा अवलंब करावा. कीड नियंत्रणासाठी पट्टा पद्धतीचा लाभ होतो.
गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.