बॉक्स
तंत्रनिकेतन आयटीआय प्रवेश कसे होणार?
दहावीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसारच तंत्रनिकेतन आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआयच्या प्रवेशासाठी शासन कोणते निकष लावणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच असल्याचे दिसत आहे.
बॉक्स
प्रवेश ऑफलाइन झाले तर परीक्षेची भीती
शासनाने ऑफलाइन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान शासनापुढे असणार आहे. कोरोना वाढला असल्याने शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यात पुन्हा ऑफलाइन परीक्षा झाल्यास कोरोना वाढण्याची भीती आहे.
बॉक्स
ऑनलाइन परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांचे कसे होणार?
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन सीईटी शासनाने घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या परीक्षेला हजारो विद्यार्थी मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी समोर ठेवून शासनाने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार याकडे लागले लक्ष
दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार याकडे अनेक पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन अनेक शाळांमध्ये झालेलेच नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सूचना अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच मूल्यमापनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यात शासन पुन्हा एकदा सीईटी प्रवेशाबाबत काय विचार करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.