पर्यावरण संवर्धनासाठी सापांचे जीवदान महत्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:34+5:30
आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.
सिराज शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : साप किंवा नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्व आहे.
आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. मात्र आज खऱ्या अर्थाने वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. साप निघाल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला फोन करून बोलाविल्या जाते. मात्र आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. मात्र निसर्गसाखळी सापाचे असणारे महत्व लक्षात घेता आज जिल्हा प्रशासनासह सर्पमित्रांनी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. आजही अनेक ठिकाणी गारूडी हा स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र खºया अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. यासाठी प्रशासनाकडून विस्तृत मोहिम राबविण्याची गरज आहे.
वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. मात्र वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही.
आजही सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती कमी करून सापांना जीवदान देण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापाचे निसर्गातील असलेले महत्व सर्पदंशानंतर करण्याचे येणारे प्राथमिक उपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.
शासनाकडून सर्पमित्र दूर्लक्षित
ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी सर्पमित्र फोन येताच तात्काळ हजर होतात. अनेक ठिकाणी सापांना पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. सापांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभवणारे सर्पमित्र आज शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. शासनाने सर्पमित्रांना अल्प मानधन सुरू करून विविध योजनेचा फायदा देण्याची गरज आहे.