लाखांदूर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:16+5:302021-09-25T04:38:16+5:30

नागरी सुविधांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या वाचनालयाचे २१ सप्टेंबर रोजी नगरपंचायत प्रशासनाद्वारे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, लोकार्पण ...

Suspend Lakhandur Nagar Panchayat Chief | लाखांदूर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करा

लाखांदूर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करा

Next

नागरी सुविधांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या वाचनालयाचे २१ सप्टेंबर रोजी नगरपंचायत प्रशासनाद्वारे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक लाखांदूर येथील तहसीलदारांना निमंत्रित करण्यात न आल्याने प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक लाखांदूर येथील सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. दरम्यान, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तत्काळ लोकार्पण सोहळ्याविना परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता वाचनालय सुरू करण्याच्या मागणीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले होते. तथापि, याप्रकरणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या पुढाकारात डीपीओ जाधव यांच्याशी संपर्क करून वाचनालय सुरू करण्याची मागणी रेटून धरली होती. त्यानुसार डीपीओ जाधव यांनी दुसऱ्या दिवशी २२ सप्टेंबर रोजी नगरपंचायत प्रशासनाद्वारे वाचनालय सुरू केले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, तालुक्यातील काही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजकीय श्रेय लाटण्याकरिता प्रशासकीय कारवाईत हस्तक्षेप करून बेकायदेशीरपणे वाचनालय सुरू केले. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांद्वारे बेकायदेशीर पद्धतीने वाचनालय सुरू केल्याचा आरोप स्वयं नगरपंचायत प्रशासनाने करून पुढील दिवसापासून वाचनालय बंद केले. यावेळी राकाँचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, शहर निरीक्षक प्रमोद प्रधान, युवक शहर अध्यक्ष अमोल बीडवाईकर, युवक अध्यक्ष राकेश राऊत, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मिलिंद डोंगरे, युवक उपाध्यक्ष मंगेश ब्राह्मणकर, राकाँ तालुका महासचिव सुभाष दिवठे, शहर उपाध्यक्ष संजय नहाले, शुद्धोधन टेंभुर्णे, वैभव खोब्रागडे, रजनिकांत खंडारे, नितीन राऊत आदी उपस्थित होते.

बॉक्स :

दोन दिवसांपासून नगरपंचायत मुख्याधिकारी नॉट रिचेबल

स्थानिक लाखांदूर नगर पंचायतद्वारा निर्माणाधीन वाचनालयाच्या लोकार्पणाच्या मुद्यावर तालुक्यातील राजकीय पक्षांचे वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, वाचनालय सुरू-बंद केले जात असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह नागरिकांतून नगरपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. यासबंध प्रकरणास स्थानिक नगरपंचायत मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून सुटीवर असलेले नगरपंचायत मुख्याधिकारी गत दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचा आरोप केला जात आहे.

230921\2838img20210923161701.jpg

पञपरीषदेतुन माहिती देतांना तालुकाध्यक्ष बालु चुन्ने, शहर अध्यक्ष ॲड मोहन राऊत व अन्य

Web Title: Suspend Lakhandur Nagar Panchayat Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.