निलंबन झाले, आता पाेलीस कारवाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:36 AM2021-01-23T04:36:11+5:302021-01-23T04:36:11+5:30
यासंदर्भात जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप चाैकशी अहवाल प्राप्त झाला नाही, अहवाल आल्यानंतर त्यात ...
यासंदर्भात जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप चाैकशी अहवाल प्राप्त झाला नाही, अहवाल आल्यानंतर त्यात नेमके काय आहे, यावरून दिशा निश्चित हाेईल, असे सांगितले. तूर्तास प्रशासकीय कारवाई झाली असली तरी पाेलिसांत काेणताही गुन्हा दाखल झाला नाही.
बाॅक्स
सीएसचा पदभार पीयूष जक्कल यांच्याकडे
आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रमाेद खंडाते यांच्या निलंबनाची घाेषणा केली, त्यानंतर येथील जिल्हा शल्यचिकित्सकाचा पदभार अस्थिराेगतज्ज्ञ डाॅ. पीयूष जक्कल यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता डाॅ. खंडाते यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनीता बढे यांची बदली करण्यात आली असली तरी त्यांची नियुक्ती कुठे करण्यात आली याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे समजते.