पालांदूर येथे ७९ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:44+5:302021-01-14T04:29:44+5:30
पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर येथील माहिती गोळा करण्यात आली. त्यासाठी अंगणवाडी सेविका आशावर्कर यांची मदत घेतली जात आहे. भुसारी यांच्या ...
पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर येथील माहिती गोळा करण्यात आली. त्यासाठी अंगणवाडी सेविका आशावर्कर यांची मदत घेतली जात आहे. भुसारी यांच्या पोल्ट्री फार्मला उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार मल्लिक वीरानी, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
बॉक्स
बर्ड फ्लूचा धोका नाही मात्र काळजी घ्या
तूर्तास जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नाही. मात्र काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले. पोल्ट्री फार्मची स्वच्छता ठेवा, मास्क व ग्लोव्हज वापरून काम करा, अर्धवट शिजलेले मांस खाऊ नका, एखादा पक्षी मृत्यूमुखी पडल्यास त्याची संबंधित विभागाला सूचना द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
पोल्ट्री फार्म चालकांनी सूचनांचे तंतोतंत पालन करावे, कोणताही हलगर्जीपणा करू नये, पालांदूर येथील नमुन्याचा अहवाल आल्यानंतर योग्य नियोजन करण्यात येईल. बर्ड फ्लूची काळजी घ्या. मात्र भीती बाळगू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.
-डॉ. वाय. एस. वंजारी, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन.