जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण ऑनलाईन व्याख्यानमालेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:33+5:302021-08-23T04:37:33+5:30

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची आवड, जिज्ञासा, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. ...

Take advantage of the Global Tribal Asmita Smaran Online Lecture Series | जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण ऑनलाईन व्याख्यानमालेचा लाभ घ्या

जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण ऑनलाईन व्याख्यानमालेचा लाभ घ्या

Next

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची आवड, जिज्ञासा, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, नागपूर जिल्ह्यातील व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे, यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. ब्रह्मानंद पुंगाटी, डॉ. राहुल मार्गिया, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. देवेंद्र मडावी यांचे मार्गदर्शन होणार आहे. या व्याख्यानमालेचे आज सायंकाळी पाच वाजता https://youtu.be/MC0C8gp97yw या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन भंडाराचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे.

Web Title: Take advantage of the Global Tribal Asmita Smaran Online Lecture Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.