कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:08+5:30
हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकºयांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानपिकावरील $कीडींचा नायनाट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.
फवारणी करताना सुरक्षित कीटचा वापर करावा. शेतकऱ्यांनी अंगावर कीटकनाशक उडणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकावरील लेबल व माहिती पूर्णपणे वाचून सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीचा आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो.
हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकऱ्यांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.
फवारणी केलेल्या शेतात मनुष्य अथवा जनावरांस चरण्यास प्रवेश करू देऊ नये. कीटकनाशकांचे डबे पुन्हा न वापरता ते खोल खड्ड्यात पुरून टाकावे. तंबाखू, खर्रा खाण्याचे शक्यतो टाळावे. अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणताही धोका न होता फवारणी परिणामकारक होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.
बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजी
एखादी व्यक्ती फवारणी करत असताना बाधित झाल्यास अथवा कीटकनाशक पोटात गेल्यास त्वचा,डोळे, श्वसनेेंंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्वरीत अपघात स्थळापासून दूर नेऊन त्याच्या अंगावरचे कपडे त्वरित बदलावे. बाधीत व्यक्तीचे अंग, अवयव साबणाने स्वच्छ धुवावेत. कोरड्या टॉवेलने पुसावे कीटकनाशक पोटात गेल्यास ताबडतोब ओकारी करण्यास सांगावी. जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे, थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे. श्वासोश्वास योग्य रीतीने सुरू आहे का याची तपासणी करावी. कीटकनाशक माहिती पत्रिकेप्रमाणे अँटी बायोटिक घ्यावे. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये बाधित व्यक्तीस त्वरित कीटकनाशकाच्या पत्रकासह डॉक्टरांना दाखवावे. प्राथमिक उपचार करुन त्वरीत दवाखाण्यात नेल्यास जीवीतहानी टळू शकते. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय कार्यालय, भंडाराचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी केले आहे.