पवनी येथे तालुकास्तरीय प्रथम समन्वय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:07+5:302021-09-25T04:38:07+5:30

पवनी : गट साधन केंद्र, पंचायत समिती, पवनी येथे शैक्षणिक सत्र २०२१-२२ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडाराअंतर्गत तालुकास्तरीय ...

Taluka level first coordination meeting at Pawani | पवनी येथे तालुकास्तरीय प्रथम समन्वय सभा

पवनी येथे तालुकास्तरीय प्रथम समन्वय सभा

googlenewsNext

पवनी : गट साधन केंद्र, पंचायत समिती, पवनी येथे शैक्षणिक सत्र २०२१-२२ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडाराअंतर्गत तालुकास्तरीय प्रथम समन्वय सभा २२ सप्टेंबर २०२१ डायटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता मनीषा यादव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पवनीचे गटशिक्षणाधिकारी एन. टी. टिचकुले, विस्तार अधिकारी व्ही.एन. भुरे, विषय सहायक देवानंद घरत, गडपायले व केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुका गुणवत्ता विकाससंदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा यांनी २४ ऑगस्ट २०२१ च्या सभेत दिलेल्या नियोजनानुसार विषय साधनव्यक्ती, विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक यांनी कार्याचा आढावा पीपीटीद्वारे सादर केला.

बोरीकर यांनी ऑगस्ट व २०२० सप्टेंबरपर्यंत तालुक्यात सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा पीपीटी व व्हिडिओद्वारे सादर केला. मोटघरे, रेहपाडे, दलाल, नंदुरकर, रामटेके, लोणारे, वाहाने यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या विषयांचा आढावा व्हिडिओ व पीपीटीद्वारे सादर केला. तसेच विशेष शिक्षक यांच्याशी हितगूज साधून त्यांच्या कार्याचे अवलोकन केले.

सर्वप्रथम टिचकुले यांनी तालुक्यात सुरू असलेली कामे व येणाऱ्या अडचणी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितल्या. यादव यांनी सादरीकरण करण्याकरिता पीपीटी व व्हिडिओला महत्त्व द्यावे, मराठी, गणित, विज्ञान या विषयांशी संबंधित स्वतः एखाद्या घटकावर आधारित छोटे-छोटे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना अध्ययनाकरिता द्यावे, असे सांगितले. घरत यांनी अभ्यासमाला, स्वाध्याय उपक्रम, शिक्षण परिषदेच्या लिंकविषयी माहिती दिली. तसेच लवकरच व्हिडिओ व पी.पी.टी. कशी आकर्षक बनवायची याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे सांगितले. गडपायले यांनी इन्सायर अवाॅर्ड, नवोदय परीक्षा, नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र याबाबत माहिती दिली.

सभेमध्ये सूचित केलेल्या सूचनांचे पालन करून तालुका प्रथम येण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन सर्व केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विषयतज्ज्ञ, फिरते विशेष शिक्षक यांनी दिले. आजची सभा प्रेरणादायी ठरली, समुपदेशन वेळोवेळी होत राहिले. निश्चितच आमचा तालुका कुठेही मागे येणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. सूत्रसंचालन नंदूरकर यांनी केले, तर आभार रेहपाडे यांनी मानले.

बॉक्स

सूक्ष्म समुपदेशन

अभ्यासमाला, स्वाध्याय उपक्रम, सेतू अभ्यासक्रम, आदर्श शाळा, नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, तेजस उपक्रम, थॅक्स ए टीचर, एनएएस, दिव्यांग मुलांचे अध्ययन आणि अध्यापन, दिव्यांग बालकांसाठी फिजिओथेरपी कार्यपद्धती, शिकू आनंदे, विज्ञानाचा गुरुवार, गप्पा गोष्टी, शाळा सिद्धी इत्यादी शैक्षणिक उपक्रमाबाबत उपस्थित सर्व समग्र शिक्षा कर्मचारी वर्गाचा वैयक्तिक आढावा घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांवर कसा तोडगा काढता येईल, याबाबत सूक्ष्म समुपदेशन केले.

Web Title: Taluka level first coordination meeting at Pawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.