गडकोट संवर्धनासाठी तुमसरचे मावळे रायगडकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:32+5:30

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडवर हे मावळे साफसफाई मोहीम राबविणार आहेत. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणार आहेत. यासोबतच अनाथ आणि गरजू लोकांनाही मदत पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. युवावर्गापर्यंत शिवाजी महाराजांची शिकवण पोहचविण्यासाठी ही मंडळी पुढाकार घेत आहे.

Tawsar mawls leave for Raigad for Gadkot conservation | गडकोट संवर्धनासाठी तुमसरचे मावळे रायगडकडे रवाना

गडकोट संवर्धनासाठी तुमसरचे मावळे रायगडकडे रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देगडावर सफाई मोहीम : छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचा पुढाकार, वृक्षांचे संवर्धनही करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून तुमसर शहरातील मावळे किल्ले रायगडकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणी गडाची साफसफाई आणि वृक्षसंवर्धन मोहीम ही तरुणाई राबविणार आहेत.
तुमसर येथील छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानने गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचेच औचित्य साधून दिवाळीच्या पर्वात तुमसरातील ही मंडळी रायगडकडे रवाना झाली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडवर हे मावळे साफसफाई मोहीम राबविणार आहेत. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणार आहेत. यासोबतच अनाथ आणि गरजू लोकांनाही मदत पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. युवावर्गापर्यंत शिवाजी महाराजांची शिकवण पोहचविण्यासाठी ही मंडळी पुढाकार घेत आहे.
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या नेतृत्वात नितीन दमाहे, सुमीत जिभकाटे, प्रतीक बुधे, ऋषी धांडे, हरिष तरटे, वैभव साठवणे, अक्षय दमाहे, लोकेश मानकर, रोहीत पारधी, प्रदीप धांडे, शुभम नागमोते रायगडकडे रवाना झाले आहेत. तुमसरकरांनी या तरुणांनी शुभेच्छा देत रवाना केले. तुमसरसारख्या शहरातून या तरुणांनी घेतलेला पुढाकार सर्वांसाठीच आदर्श ठरणारा आहे. तुमसरची मंडळी रायगडकडे रवाना झाली असून तेथे पोहचल्यानंतर गडाच्या साफसफाई मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जाईल, असे नितीन धांडे यांनी सांगितले.
 

Web Title: Tawsar mawls leave for Raigad for Gadkot conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड