लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना होत असून दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. या लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमुळे तिहेरी शिधापत्रिका पध्दत संपुष्ठात आली. प्राधान्य कुटूंब योजना लागू झाली. यामध्ये दारिद्रय रेषेखालील १०० टक्के लाभार्थी, तसेच केशरी शिधापत्रिकेमधील ग्रामीण क्षेत्राकरिता ४४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न व शहरी क्षेत्रातील ५९ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे.भंडारा जिल्ह्यात एकूण सात लाख ११ हजार ६५ लाभार्थ्यांची निवड करून प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. तसेच अंत्योदय योजनेच्या ६४ हजार ५८५ शिधापत्रिकामधील दोन लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रति कार्ड ३५ किलो अन्नधान्य दिले जात आहे. दोन्ही योजनेत जिल्ह्यातील एकुण दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकेवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.सदर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये भंडारा तालुका ४१ हजार ५२४ शिधापत्रिका, १ लाख ९६ हजार ३६३ लाभार्थी. मोहाडी २९ हजार ९३ शिधापत्रिका, एक लाख ४० हजार ९२१ लाभार्थी. तुमसर ४२ हजार १३६ शिधापत्रिका, दोन लाख १० हजार २१७ लाभार्थी, लाखनी २२ हजार ५६९ शिधापत्रिका धारक आहेत.एक लाख ११ हजार ५६० लाभार्थी. साकोली २१ हजार ८०८ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ५६० लाभार्थी. पवनी २६ हजार ७५ शिधापत्रिका, एक लाख ३० हजार ९८५ लाभार्थी. लाखांदूर २२ हजार २२३ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ६५२ लाभार्थी असे दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकांवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.४१ हजार शिधापत्रिकाधारकांसाठी पाठपुरावाराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे पाठपुरावा सुरु आहे. शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतीक्षेत असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्यात येईल.
अन्न सुरक्षेत दहा लाख लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:26 PM
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ...
ठळक मुद्देधान्याचा लाभ : भंडारा जिल्ह्यात दोन लाख पाच हजार शिधापत्रिकाधारक