महावितरण मोबाईल अ‍ॅपचे दहा लक्ष ग्राहक

By Admin | Published: February 18, 2017 12:17 AM2017-02-18T00:17:55+5:302017-02-18T00:17:55+5:30

राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून ...

Ten lakh customers of the Mahavitaran Mobile app | महावितरण मोबाईल अ‍ॅपचे दहा लक्ष ग्राहक

महावितरण मोबाईल अ‍ॅपचे दहा लक्ष ग्राहक

googlenewsNext

भंडारा : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ सात महिन्यात सुमारे १० लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडींग घेण्यात आले आहे. तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला असून सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा वीजसेवाविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रिडींग घेण्यात आले नाही त्यांना अ‍ॅपद्वारे रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.
राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी कर्मचारी मित्र अ‍ॅप डाऊनलोड केले असून याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचुक वीजमिटर रिडींग, फिडर व डीटीसी मीटर रिडींग इत्यादी दैनंदिन कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात अधिक गती आली आहे.
महावितरणच्या सुमारे १ कोटी ४ लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना मीटर रिडींग वीजबिल, आॅनलाईन बिल, नवीन वीजोडणीसाठी अर्ज व त्यांची सद्यास्थिती, मोटार वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएम्एसद्वारे पाठविण्यात येते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ten lakh customers of the Mahavitaran Mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.