लाखांदूर तालुक्यात दहा बालके शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:04 AM2021-03-13T05:04:06+5:302021-03-13T05:04:06+5:30
तालुक्यातील सर्वच अंगणवाडीसेविका, प्राथमिक व माध्यमिक खासगी व शासकीय शालेय शिक्षकांमार्फत शाळाबाह्य विद्यार्थी बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सदर ...
तालुक्यातील सर्वच अंगणवाडीसेविका, प्राथमिक व माध्यमिक खासगी व शासकीय शालेय शिक्षकांमार्फत शाळाबाह्य विद्यार्थी बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सदर सर्वेक्षण शिक्षण विभागांतर्गत ३०९ शालेय शिक्षकांनी व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रगणक म्हणून केले. त्यानुसार संबंधित प्रगणकांनी तालुक्यातील २९ हजार ५७० कुटुंबांना भेट देऊन शाळाबाह्य विद्यार्थी बालकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार तालुक्यात केवळ दोन बालके शाळाबाह्य, पाच बालके स्थलांतरित झालेले तर तीन बालके स्थलांतरण अंतर्गत तालुक्यात दाखल झालेली अशी एकूण १० बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत.
दरम्यान, शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा व सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली जात असताना तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्याने अनेकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तथापि गत वर्षापासून देशात व राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संकटामुळे स्थलांतरणाच्या प्रमाणात वाढ होऊन शाळाबाह्य विद्यार्थी बालकांच्या संख्येतदेखील तालुक्यात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.