ठाकरे यांचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:15 AM2018-01-19T00:15:00+5:302018-01-19T00:15:11+5:30
आठ जिल्हा परिषद सदस्य एकट्या तुमसर तालुक्यात असूनही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकही सदस्याची वर्णी पक्षश्रेष्टीने न लावल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षाकडे सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आठ जिल्हा परिषद सदस्य एकट्या तुमसर तालुक्यात असूनही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकही सदस्याची वर्णी पक्षश्रेष्टीने न लावल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षाकडे सोपविली आहे. १५ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली.
यात काँगे्रस व राकाँची आघाडी होती. ५२ सदस्य आहेत. त्यात पवनी तालुक्यात ४ तर भंडारा येथे ३ सदस्य तर एकट्या तुमसर तालुक्यात दोन्ही तालुका मिळून होणाºया संख्येपेक्षाही जास्त म्हणजे ८ सदस्य असल्यामुळे जि.प. चे उपाध्यक्षपद हे तुमसर तालुक्यालाच मिळावे म्हणून आठ सदस्यांच्या शिष्टमंडळासोबत पक्षश्रेष्ठीकडे विनंती केली. नागरिकांचा सन्मानाकरितातरी उपाध्यक्षपद द्यावे अशी वारंवार विनंती करूनही पक्षश्रेष्ठीने पवनी तालुक्यालाच दुसºयांदाही प्राधान्य दिले. त्यामुळे नाराज तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी तालुक्याची नैतिक जवाबदारीच्या आधारावर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे राकाँ जिल्हाध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्षा, जिल्हाध्यक्ष असे महत्वाचे पद भूषविणारे तुमसरातच आहेत. मात्र त्यांनाही तालुक्याविषयी कळवळा दिसून येत नसल्याची खंत देवचंद ठाकरे यांनी बोलून दाखविली.