रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा!

By Admin | Published: February 18, 2017 12:22 AM2017-02-18T00:22:38+5:302017-02-18T00:30:08+5:30

रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर आणि जिल्हा आरोग्य प्रशासन आपली सेवा देत असले तरी ..

That's the only God service! | रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा!

रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा!

googlenewsNext

सुनील फुंडे : लाखनीत महाआरोग्य शिबिराचा अडीच हजार रूग्णांनी घेतला लाभ
लाखनी : रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर आणि जिल्हा आरोग्य प्रशासन आपली सेवा देत असले तरी अनेक रुग्ण चांगल्या सेवेपासून दूरच असतात. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रेमामुळेच आज जनता मोठ्या संख्येने महाआरोग्य शिबिरात आली आहे. रुग्णांची सेवा करणे ही ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सुनील फुंडे यांनी केले.
खा. प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाखनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष धनू व्यास व मित्र परिवार व लाखनी नगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले होते. या महाशिबिराचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादीचे नेते सुनील फुंडे तर अध्यक्ष म्हणून मधुकर कुकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून अविनाश ब्राम्हणकर, विकास गभने, अशोक चोले, बाळा शिवणकर,निलेश गाढवे, दिपाली जांभुळकर, उर्मिला आगासे, डॉ. पियुष जक्कल, डॉ. नान्हे, डॉ. कुथे, डॉ. नाईक आपल्या चमूसह प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरात सुगर, कान, नाक, घसा, बाल रोग, तपासणी अस्थिरोग अशा प्रकारच्या तपासणी करुन औषधांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक न.प. उपाध्यक्ष धनु व्यास यांनी संचालन गुणवंत दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन पाखमोडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रशांत मेश्राम, सुनिल चोचेरे, शशिकांत भोयर,राजू शिवरकर, सुनील चाफले, झंझाड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिरात २००० ते २५०० लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: That's the only God service!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.