दराेडेखाेरांचा शाेध लागलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:47+5:302021-01-17T04:30:47+5:30
सानगडीच्या स्टेट बँकेच्या शाखेतील मागील बाजूची खिडकी फाेडून चाेरट्यांनी कटरच्या साहाय्याने तिजाेरी फाेडून साेने व राेख रक्कम लंपास केली. ...
सानगडीच्या स्टेट बँकेच्या शाखेतील मागील बाजूची खिडकी फाेडून चाेरट्यांनी कटरच्या साहाय्याने तिजाेरी फाेडून साेने व राेख रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पाेलीस अधिकाऱ्यांसह पाेलिसांचा माेठा ताफा हजार झाला. चाेरांचा शेधासाठी सहा पथक नेऊन पाठविण्यात आले. मात्र, आतापर्यंत पाेलिसांना चाेरांचा शाेध लागला नाही. सदर चाेरी प्रकरणात गॅस सिलिंडरचा वापर करण्यात आला. हा गॅस सिलिंडर गाेंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पाेलीस स्टेशन हद्दीतील एका दुकानातून चाेरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात साकाेली तालुक्यात आतापर्यंत तीन बँक फाेडण्यात आल्या. यात पहिली घटना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा विर्शी, दुसरी घटना बँक ऑफ इंडिया शाखा साकाेली व तिसरी स्टेट बँक शाखा सानगडीची आहे. पैकी बँक ऑफ इंडियातील चाेरी प्रकरणातील आराेपींचा शाेध लागला आहे. मात्र, विर्शी येथील चाेरी प्रकरणाला दाेन वर्षांचा कालावधी लाेटला तरीही चाेरांचा शाेध लागला नाही.