सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच उपचार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:00 AM2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:15+5:30
सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार व्यवस्था करण्याची जबाबदारी ही आरोग्य प्रशासनाची असून यात दुर्लक्षित धोरण अवलंबिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. साकोली तालुक्यातील कोरोना संदर्भात तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना घरीच उपचार व्यवस्था देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण परिसरात वाढत असल्याने ग्रामीण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांच्या मनातील ही दहशत व भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने माणुसकी जपून जबाबदारीपूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून प्रामाणिकरित्या प्रत्येक नागरिकांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे.
सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार व्यवस्था करण्याची जबाबदारी ही आरोग्य प्रशासनाची असून यात दुर्लक्षित धोरण अवलंबिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
साकोली तालुक्यातील कोरोना संदर्भात तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना घरीच उपचार व्यवस्था देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याचे सांगितले. नागरिकांनी स्वयंस्फूतीर्ने लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी तहसीलदार रमेश कुंभरे यांनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व अतिवृष्टी मुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केला याप्रसंगी पटोले यांनी पडझड झालेल्या घराबद्दल पुनर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी निलेश वानखेडे, कोरोना संदर्भात जनजागृती करीत असल्याची माहिती याप्रसंगी साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, मुख्याधिकारी माधुरी मडावी व तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे पाटील सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाविषयीची असलेली भीती दूर करावी
कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी मास्टर प्लान तयार करून ग्रामीण नागरिकांना सोईस्कर होईल अश्या आरोग्यसुविधा ग्रामपातळीवर कशा उपलब्ध करता येतील याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार, खंड विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले. ज्या रुग्णांच्या घरी होम आयसोलेशनची सोय नसल्यास गावातीलच शाळांमध्ये अथवा पर्यायी व्यवस्थेनुसार त्या रुग्णांची सोय गावातच करण्यात यावी जेणेकरून नागरिकांमध्ये असलेली प्रशासनाविषयी भीती दूर होईल व नागरिक स्वयंस्फूतीर्ने प्रशासनाला सहकार्य करतील अशी भूमिका आपण घ्यावी, अशा सूचना पटोले यांनी केल्या.