भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 02:32 PM2022-07-09T14:32:27+5:302022-07-09T16:11:59+5:30

ही भीषण घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी गावाजवळ शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली.

Two trucks collide on Bhandara-Nagpur National Highway kharbi naka; Three killed in accident | भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

Next
ठळक मुद्देट्रकचा चुराडा

जवाहरनगर (भंडारा) : राष्ट्रीय महामार्ग खरबी (नाका) जिल्हा सीमा लगत उभा असलेल्या ट्रकला मागाहुन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन तरुण ठार झाले. ही घटना भंडारा तालुक्यातील खरबी येथे शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. शत्रुघन प्रसाद (२६), मुरारी सिंग (२८), रोहित पटेल (२२) मूळचे बिहार येथील रहिवासी असे मृतकाची नावे आहेत.

राष्ट्रीय महामार्ग खरबी (नाका) जिल्हा सीमेलगत नवीन पेट्रोलपंप जवळील रस्त्यालगत लाल रंगाची मातीची वाहतूक करणारा ट्रक (जी.जे.३६-व्ही-९४९५) काही कामात निमित्त रस्त्याच्या कडेला, नागपूर दिशेने उभा होता. याच दिशेने रायपूर होऊन नागपूरकडे लोखंडाची वाहतूक करणारा ट्रक (सी.जी.०४ जे.सी.४०१३) येत होता. दरम्यान या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला, जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की धडक मारणाऱ्या ट्रकमधील तीनही तरुण, दर्शनी भागाच्या चुराडा झालेल्या केबिनमध्ये फसल्या गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ट्रकमधील तीनही तरुणांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. यातील मुरारी सिंग व रोहित पटेल दोघेही जागीच ठार झाले होते. तर ट्रकचालक शत्रुघन प्रसाद अति गंभीर जखमी असल्याने त्याला भंडारा टू नागपूर वाहनाद्वारे नेण्यात आले. मात्र वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. तीनही तरुण हे मूळचे बिहार येतील राहणारे असून, रायपूर येथे मालवाहतूक करिता कामावर होते. जवाहरनगर पोलिसात आपल्या मृत्यूला स्वतः कारणीभूत ठरले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Two trucks collide on Bhandara-Nagpur National Highway kharbi naka; Three killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.