पत्रकारितेचा उपयोग समाज विकासासाठी
By admin | Published: February 14, 2017 12:24 AM2017-02-14T00:24:05+5:302017-02-14T00:24:05+5:30
ग्रामीण भागातील जनतेचा अतूट विश्वास असल्याने जनतेच्या अतूट विश्वासाला तडा न जाऊ देता ...
पत्रकार संमेलन : वसंत एंचीलवार याचे प्रतिपादन
लाखांदूर : ग्रामीण भागातील जनतेचा अतूट विश्वास असल्याने जनतेच्या अतूट विश्वासाला तडा न जाऊ देता पत्रकारांनी निष्पक्ष, निस्वार्थ, निधर्मी लेखणी करून पत्रकारितेचा उपयोग समाजविकासासाठी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा परिषद भंडाराचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अॅड. वसंत एंचीलवार यांनी केले.
लाखांदूर येथे आयोजित विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय पत्रकार संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
विदर्भ ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा भंडाराच्या वतीने लाखांदूर येथे जिल्हास्तरीय पत्रकार सम्मेलन तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. उदघाटन संपादक निशांत कांबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य मनोहर राऊत, जि.प.सदस्य प्रदीप बुराडे, नगर पंचायतचे गट नेते रामचंद्र राऊत, पं.स.सदस्य शिवाजी देशकर, पं.स.सदस्य गुलाब कापसे, काँगेसचे जिल्हा महासचिव अधिवक्ता धम्मदीप रंगारी, भाजपा तालुकाध्यक्ष नूतन कांबळे, महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रियंक बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील भोवते, संचालक मुकेश भैय्या, संचालक तेजराम दिवठे, संपादक मनोहर मेश्राम उपस्थित होते.
प्रास्ताविक विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष निशाद लांजेवार यांनी केले. त्यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा मांडत असतांना ग्रामीण भागातील पत्रकारांना योग्य न्याय देण्यासाठी लढा उभा करणार असल्याचे सांगितले.
मनोहर राऊत यांनी पत्रकारांना महाभारतातील संजयची उपमा देत दूरदृष्टी ठेऊन पत्रकारिता करावी जेणेकरून समाज घडेल.समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय मिळेल.असे प्रतिपादन केले. जि.प.सदस्य प्रदीप बुराडे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. गटातटाचे राजकारण न करता निष्पक्ष पत्रकारिता करावी असे आवाहन केले. निशांत कांबळे यांनी ग्रामीण पत्रकारांवर अनेकवेळा अन्याय होत असतो. ज्यांच्यासाठी पत्रकार निष्काम सेवा करण्याचा प्रयत्न करतो. मात्र एखाद्या पत्रकारावर संकट आले तर तेच मानसं साथ देत नाही अशावेळी पत्रकारांची संघटना मदतीला धाऊन येतो. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यात संपादक निशांत कांबळे, वसंत एंचीलवार, जि.प.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, गटनेते रामचंद्र राऊत, शिवाजी देशकर, गुलाब कापसे, नूतन कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक सुनील भोवते, मुकेश भैय्या, तेजराम दिवठे, देविदास राऊत, उर्मिला राऊत, धम्मदीप रंगारी, प्रियंक बोरकर,संपादक मनोहर मेश्राम यांचा समावेश होता. संमेलनाला जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.
संचालन जितेंद्र ढोरे यांनी तर आभार नरेंद्र रामटेके यांनी केले. कार्यक्रमासाठी पावन समरत, स्वप्नील ठेंगरी, हेमंत मेश्राम, पुरुषोत्तम माकडे, ईश्वर कुंभलवार, नरेश सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)