नीलकंठ कायते म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काढून मुलींसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. सरपंच मेघा उईके यांनी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येते. या आरक्षणाच्या माध्यमातून आपण सरपंच पदापर्यंत पोहोचलो, हे सर्व भारतीय घटनेचे अधिकार आहेत. यालाच लोकशाही म्हणतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय महिलांनी चूल आणि मूल यांच्यातच न राहता, समाजकार्याकडे व समाजाच्या उन्नती करण्याकरिता पुढे यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी उज्ज्वला मारवाडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी हेमलता मारवाडे, कल्याणी मारवाडे, मनीषा गजभिये, प्रिया बनसोड, नगीना बनसोड, जोत्सना नागदेवे, रंजना बनसोड, मीनाक्षी मारवाडे, लीला भेंडारकर, श्रेया गजभिये आदींनी सहकार्य केले. संचालन दर्शिता मेश्राम यांनी तर आभार निशा सोमकुवर यांनी मानले.
चांदोरी येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:35 AM