भंडारा : गाव विकासासाठी ग्रामस्थांसह गाव पुढाऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने विकासकामांसाठी प्रयत्न केल्यास गावात कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यासाठी गाव पुढाऱ्यांनी झटण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.
भंडारा तालुक्यातील धारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात भरारी सोशल फाउंडेशनतर्फे ग्रामपंचायत नवनियुक्त सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाचे उद्घाटन ज्येष्ठ महिला लायनाबाई खंगार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून देवानंद नंदेश्वर, सुरेश खंगार, वसंता पडोळे, महेश निंबार्ते, दीपक जनबंधू, अर्जुन टेंभूर्णे, धारगावचे सरपंच संतोष पडोळे, उपसरपंच अश्विन नंदेश्वर, देवानंद वालदेकर, दिलीप कायते, संदीप खंडाते आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक भरारी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. सुजाता जयघोष वालदेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायत नवनियुक्त सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन हिरालाल नंदेश्वर तर आभार प्रदर्शन सुनीता किंदर्ले यांनी केले. समारंभासाठी रेखा नंदेश्वर, शारदा नंदेश्वर, अनुसया बोदेले, बबीता करवाडे, सुघ्रता बोदेले, नंदा अंबादे, प्रतीभा कुंभलकर, वैष्णवी टेंभेकर, कोमल बोदेले, ताराचंद गिरीपुंजे, सुचिता रोटके, सरिता गिरीपुंजे, रेखा मदारकर, मीनाक्षी माथूरकर आदींनी सहकार्य केले.
बॉक्स
नवनियुक्त सदस्यांचा सत्कार
धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायत नवनियुक्त सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात संतोष पडोळे, अश्विन नंदेश्वर, कोमल बोदेले, शीतल हटवार, प्रतिमा कोचे, राजू कुंभलकर, हर्षा भैसारे, गणेश सरोते, दीपक वंजारी, उषा वरकडे, रजनी रेहपाडे, मेघा उईके, छत्रपती कागदे, सीमा निंबार्ते, सत्यभामा बांते, सुरेश बांते, संध्या निंबार्ते, उर्मिला चाचेरे, कलकेश्वरी मेश्राम, अंजली वासनिक, योगराज थोटे, जयेंद्र मरसकोल्हे, रंजना मोटघरे, जागेश्वर पाल, दीपक पडोळे, श्यामदेव ढोणे, प्रशांत गजभिये, दिलीप कायते, मनिषा वासनिक, संदीप खंडाते, ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, संगीता बोरकर, वृशाली शहारे, राकेश शेंडे, रजनिकांत लाडे यांचा समावेश होता.