४५ गावातील धान पीकधोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:44 AM2019-07-24T00:44:47+5:302019-07-24T00:45:13+5:30

सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.

In the village paddy crop | ४५ गावातील धान पीकधोक्यात

४५ गावातील धान पीकधोक्यात

Next
ठळक मुद्देसिहोरा परिसरातील शेतकरी संकटात : चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी दिला आहे.
पावसाळा सुरू होऊन महिना लोटला. मागील २० दिवसांपासून पाऊस पडला नाही. सुरूवातीला आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली ती खार आता आली आहे. खार पिवळी पडली तर कुठे ती गळायला सुरवात झाली आहे. काहींनी रोवणी केली, तीव्र उष्णतेमुळे शेतात भेगा पडायला सुरूवात झाली आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावात शेतीकरिता चांदपूर जलाशयातील पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी जोर धरत आहे.
अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचा सामना सध्या करावा लागत आहे. चांदपूर जलाशयात सध्या २६.५४ टक्के पाणी साठा इतका आहे. जिवंत साठा २५ टक्के आहे. नियमानुसार येथे ३३ टक्के पाणीसाठा असेल तरच जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येते. परंतु किमान काही दिवस संपूर्ण धानाचे पीक वाचविण्याकरिता येथे पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे.

जिल्हा पाटबंधारे विभागाकडे मागणी
स्थानिक पाटबंधारे विभागाने भंडारा येथील कार्यालयाकडे १९ जुलै रोजी चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता एका पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु अद्याप परवानगी मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये येथे पाण्याचा विसर्ग करण्याची परवागनी मिळाल्यानंतरच चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. अद्याप येथे प्रतीक्षा करावी लागत आहे.
राकाँने दिला अल्टिमेटम
राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी चांदपूर जलाशयातून २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी स्थानिक शेतकऱ्यांसोबत चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी नरेश गीते मंगळवारी रूजू झाले. त्यांनी सदर समस्येकडे गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.

चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता १९ जुलै रोजी भंडारा येथील मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी रितसर प्राप्त होताच पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.
-जे.आर. हटवार, उपविभागीय अभियंता, चांदपूर प्रकल्प तुमसर.

Web Title: In the village paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.