जवाहरनगर : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय, नागपूर अंतर्गत कवडसी येथे दोन दिवसीय ग्रामीणस्तरीय मनरेगा व विस्थापित श्रमिकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात श्रमिक व रोजगार मंत्रालय भारत सरकारचे उपसचिव व आर्थिक सल्लागार दिल्लीचे. एस. राव, उपनिदेशक शिक्षा एस. के. रॉय मुख्यालयाचे उपनिदेशक प्रदीप मून यांनी, शासनाच्या विविध योजना जसे, मनरेगा योजना, शिक्षणाचे महत्त्व ,वाईट चालीरीती, आरोग्य व कुटुंंब नियोजन, बजेट, बचत व स्वयंसहायता बचत गट, सरकारच्या कल्याणकारी विविध योजना व ग्रामीण श्रमिकांच्या आर्थिक विकास इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली.
शिबिरार्थिंनी आपले अनुभव विशद केले. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आशा जिभकाटे व असंंघटित, संंघटित क्षेत्रातील मजूर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रादेशिक संचालक चंद्रशेखर वैद्य यांनी केले. तर राजेश झोडापे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माधुरी डोंगर, यशोधरा रामटेके, सुभाष रामटेके यांनी सहकार्य केले.