प्रतीक्षा संपली... कोरोना लस टोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:55+5:302021-01-17T04:30:55+5:30
भंडारा, तुमसर आणि लाखनी येथे डॉक्टर व हेल्थ वर्कर यांनी सकाळपासूनच केंद्रासमोरच रांगा लावल्या होत्या. लसीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्स्तुकता ...
भंडारा, तुमसर आणि लाखनी येथे डॉक्टर व हेल्थ वर्कर यांनी सकाळपासूनच केंद्रासमोरच रांगा लावल्या होत्या. लसीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्स्तुकता दिसत होती. अनेकांना लस टोचणारे डॉक्टर कोरोनाची लस घेताना भावूक झाल्याचे जाणवत होते. लस घेतल्यानंतर डॉक्टरांनी अतीशय सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बॉक्स
लसीकरण कक्षांची सजावट
एखाद्या मंगल कार्यासाठी सजविला जातो तसे तीनही ठिकाणचे लसीकरण कक्ष सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी रंगीबेरंगी रिबीन आणि बलून लावण्यात आले होते. लसीकरण कक्षाच्या समोर संदेश देणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. येथे येणारा प्रत्येक जण लसीकरणाचा उत्साह पाहून भारावून जात होता.
बॉक्स
मनात शंका न ठेवता लस घ्या
पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर अर्थात डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. शनिवारी ३०० जणांना लस टोचण्यात आली. लस घेतल्यानंतर अनेक डॉक्टरांनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मनात कुठलीही शंका न ठेवता नागरिकांनी येत्या काळात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.
बॉक्स
मास्क आणि सॅनिटायझर आवश्यकच
लस घेतल्यानंतरही कोरोना आजारापासून संरक्षणासाठी काळजी घेणे गरजेचेच आहे. ही लस आजारापासून संरक्षण करणार आहे. परंतु लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सहा फूट सरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. लसीकरणानंतर त्रास जाणवल्यास एएनएम, आशा कार्यकर्ती किंवा आरोग्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.