भंडारा : सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी असल्याने जिल्ह्यात लग्न जमविण्याची लगबग सुरू आहे. यावर्षी नोव्हेंबरनंतर म्हणजेच तुळशी विवाह झाल्यानंतर धूमधडाक्यात लग्नाचे बार उडणार असल्याचे दिसत आहे.
अनेक ज्योतिष पंचांगकर्ते यांच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक लग्नतिथी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून महिन्यात आहेत. मे महिन्यात सर्वाधिक तिथी आहेत. आता कोरोना परतीच्या मार्गाला लागला असला तरीही कोरोनाची भीती सतावत आहे. त्यामुळे पुन्हा लॅाकडाऊन होते की काय या भीतीने आता अनेक जण लग्न उरकण्याच्या घाईगडबडीत दिसत आहेत. शक्यतो दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्न सोहळे उरकले जातात. त्यामुळे आतापासूनच मुले-मुली पाहण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर ते जूनपर्यंत अनेक लग्नतिथी आहेत. यावर्षी अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त अधिक असल्याचेही ज्योतिषांनी सांगितले आहे.
मार्चमध्ये सर्वाधिक कमी मुहूर्त..
नोव्हेंबरनंतर लग्न सोहळ्याला सुरुवात होत असली तरीही आजही अनेक जण मुहूर्त, तिथी पाहूनच विवाह करतात. मात्र यावर्षी मार्चमध्ये चारच तारखा आहेत तर सर्वाधिक तारखा या डिसेंबर, मे महिन्यात आहेत.
मंगल कार्यालय बुक केले काय?
कोरोनामुळे लग्न सोहळ्यात उपस्थितीसाठी मर्यादा असल्या तरीही सद्य:स्थितीत शंभर लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोठे मंगल कार्यालयात बुकिंग करणे सुरू आहे.
यंदाचे वर्ष निरोगी आणि लग्नतिथीचे
लग्नतिथीसह निरोगी आयुष्यासाठी हे वर्ष चांगले आहे. नोव्हेंबरपासून लग्न तिथी सुरू होत आहेत. शिवाय यावर्षी शेतकऱ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे.
कोणत्या महिन्यात किती मुहूर्त
नोव्हेंबर २०, २१, २९, ३०
१, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८