वन्यप्राण्यांचा पाळीव जनावरांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:33+5:302021-01-08T05:54:33+5:30

आमगाव (दिघोरी) : भंडारा तालुक्यातील आमगाव परिसरातील कवलेवाडा, टेकेपार, डोडमाझरी, उसरागोंदी गावातील पाळीव जनावरांवर जंगलातील प्राणी हल्ला करीत ...

Wildlife attacks on pets | वन्यप्राण्यांचा पाळीव जनावरांवर हल्ला

वन्यप्राण्यांचा पाळीव जनावरांवर हल्ला

googlenewsNext

आमगाव (दिघोरी) : भंडारा तालुक्यातील आमगाव परिसरातील कवलेवाडा, टेकेपार, डोडमाझरी, उसरागोंदी गावातील पाळीव जनावरांवर जंगलातील प्राणी हल्ला करीत असल्याने पशुपालक त्रस्त आहेत. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत.

आमगाव परिसराला लागून कोका अभयारण्य आहे. तेथील वन्यप्राणी गावामध्ये रात्रीच्या वेळेस येऊन जनावरांवर हल्ला चढवित आहेत. यामध्ये अनेक जनावरे मृत झाली. तसेच काही जनावरांवर हल्ला केल्याने ते जखमी झाले.

याबाबत वनविभागाला माहिती दिली जाते. मात्र विभागामार्फत पाहिजे त्या प्रमाणात भरपाई दिली जात नाही. तसेच एखादे पाळीव जनावर जखमी झाले तर त्याच्या औषधोपचारावर पशुपालकांच्या खिशातून पैसा द्यावा लागतो. त्यामुळे वन्यप्राणी नुकसान करीत असल्याने पाळीव प्राणी पाळावे की नको, अशी भावना पशुपालकांमध्ये निर्माण झाली आहे.

अनेकदा घरी बांधलेल्या जनावरांवर बिबट्या हल्ला चढवित असताे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत आहे. मात्र त्यांचा बंदोबस्त केला जात नाही. कोका अभयारण्य वन्यप्राण्यांसाठी राखीव झाल्याने या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली आहे.

या वन्यप्राण्यांच्या देखरेखीसाठी वनविभागाजवळ मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा फौजफाटा उपलब्ध असतानासुद्धा परिसरातील शेतकऱ्यांचे शेतमालाचे व जनावरांचे नुकसान होत आहे. यासाठी कोका अभयारण्यासभोवताल तारांचे कुंपण घालण्याची अनेक दिवसांची मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.

Web Title: Wildlife attacks on pets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.